Wednesday, August 11, 2010

मैत्रीच्या पावसात

मैत्रीच्या पावसात
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.

न्हा‌ऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब

मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय

पा‌ऊस रिमझिम हसला.
ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.

जाता जाता म्हणाला,
“काळजी नको. भिजून घे खूप.
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब …!

Friday, August 6, 2010

prem

प्रेमाचा खरा अर्थ…..
Tagged with: Love Marathi Love Poems Prem preyasi priyakar Romantic Poems प्रियकर प्रेम कविता प्रेयसी
प्रेमाचा खरा अर्थ……
दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला
प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते
मी खिन्न मनाने
परत निघालो
थोडा दूर गेलो असेल तोच
काडकन आवाज झाला
प्रकाशाचा लोळ उठला
मेघातून निघालेली वीज
धाडकन वडावर कोसळली
मी त्याच्याकडे पाहिले
मरणाच्या दारात असुनही
तो हसत होता
मला म्हनाला
अरे मी तिच्यासोबत घालवलेला
हा क्षण मला पुरेसा आहे
मी समाधानाने प्राण सोडतो आहे
मी मात्र सुन्न झालो होतो
प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता

Thursday, August 5, 2010

PPAAUSSSSSS

रानाच्या वाटे…
Tagged with: Maharashtra Times Marathi Rain Poems Mrug Nakshatra Pahila Paus Paus Rain Poems Rain SMS पर्जन्य पहिला पाऊस पाऊस पावसाच्या कविता महाराष्ट्र टाईम्स
रानाच्या वाटेने
एकट पावलानी चढत ..
पावला पुढे पाऊल
निष्पर्ण रान
जणु संपतच नाही दुपार
संपतच नाही वाट
वितळून गेले भोवताल
प्राण्यापक्ष्यांसह ..

उन्हाच्या झळांनी झळाळते
झाकोळते … दूरवर धुसर होत
ओढते स्वत : ला , उतरते
जीव एकवटून
नदीच्या ओढीने
जसे तहानेले श्वापद …

अशा निस्तब्ध दुपारी
अचानक वाजले दूरवर पडघम
धुळीच्या वावटळी , वाऱ्याचे लोट ,
उधाणले रान
भयव्याकूळ तरीही उल्हसित …
भरदुपारी काळोखले आभाळ
टपोरा थेंब पडला पावलापाशी
गरम धुळीत इवलेसे खळे
पाठोपाठ सडसडत
सरींवर सरी
बारीक बारीक ओहोळांनी
जणु भेटायला आली नदी
तहानेले रान चालता चालता ….

- सुनंदा भोसेकर

MAITRIIIIIIIIIIIIIIII

मैत्री
मैत्री म्हटली की…
Written on 1 Jul, 2009 at 7:52 in मैत्री | viewed 9,585 times | 23 Comments
मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण आणि मैत्रीतुन मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण कोणी कितीही बोललं तरी कोणाचं काही ऐकायचं नाही कधीही पकडले गेलो तरी मित्रांची नावं सांगायची नाही मैत्रीचं हे नातं सगळ्या नात्यांत श्रेष्ठ हे नातं टिकवण्यासाठी नकोत खुप सारे... (Continue reading)

Tagged with: Friendship Day Friendship Poems Marathi Maitri Kavita मराठी मैत्री कविता
मैत्रीच्या पावसात..
Written on 30 Jun, 2009 at 7:52 in मैत्री | viewed 6,601 times | 8 Comments
मैत्रीच्या पावसात काल म्हटलं पावसाला, माफ कर बाबा, आज भिजायला जमणार नाही. मैत्रीच्या पावसात भिजून झालोय ओलाचिंब. न्हा‌ऊ घालतोय बघ मला शुभेच्छांचा प्रत्येक थेंब मित्रांची इतकी गर्दी झालीय भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय पा‌ऊस रिमझिम हसला. ढगांना घे‌उन क्षितीजावर... (Continue reading)

Tagged with: Friendship Day Friendship Poems Marathi Maitri Kavita मराठी मैत्री कविता

MAITRIIIII