मैत्री म्हटली की…
मैत्री म्हटली की
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक
मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे…
-----------------------
प्रेम म्हनत
"तुला काही लागल तर
मी आहे ना"
मैत्री म्हणते,
"मी जोपर्यंत आहे
तोवर तुला
आणखी कशाची
गरज भासणार नाही"
No comments:
Post a Comment