Thursday, August 5, 2010

PPAAUSSSSSS

रानाच्या वाटे…
Tagged with: Maharashtra Times Marathi Rain Poems Mrug Nakshatra Pahila Paus Paus Rain Poems Rain SMS पर्जन्य पहिला पाऊस पाऊस पावसाच्या कविता महाराष्ट्र टाईम्स
रानाच्या वाटेने
एकट पावलानी चढत ..
पावला पुढे पाऊल
निष्पर्ण रान
जणु संपतच नाही दुपार
संपतच नाही वाट
वितळून गेले भोवताल
प्राण्यापक्ष्यांसह ..

उन्हाच्या झळांनी झळाळते
झाकोळते … दूरवर धुसर होत
ओढते स्वत : ला , उतरते
जीव एकवटून
नदीच्या ओढीने
जसे तहानेले श्वापद …

अशा निस्तब्ध दुपारी
अचानक वाजले दूरवर पडघम
धुळीच्या वावटळी , वाऱ्याचे लोट ,
उधाणले रान
भयव्याकूळ तरीही उल्हसित …
भरदुपारी काळोखले आभाळ
टपोरा थेंब पडला पावलापाशी
गरम धुळीत इवलेसे खळे
पाठोपाठ सडसडत
सरींवर सरी
बारीक बारीक ओहोळांनी
जणु भेटायला आली नदी
तहानेले रान चालता चालता ….

- सुनंदा भोसेकर

No comments:

Post a Comment